आयुष्याची संध्याकाळ म्हटल्यावर ते फक्त म्हातारपण अस होत नाही तर त्यासोबत येत ज्येष्ठत्व. या वयात आठवणीचं, अनुभवाचं संचित जमा झालेलं असत. अनुभवांचे हे संचित म्हणजे नवीन पिढीसाठी मार्गदर्शन करणारे आहे यात तिळमात्र शंका नाही. आपल्या मनातील या मौलिक विचारांना, अनुभवांना नवीन पिढीपर्यंत पोहचविण्याकरिता तसेच ज्येष्ठांच्या समस्यांना वाचा फोडून ज्येष्ठांचे न्याय्य हक्क आणि सामाजिक प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी गेली बारा वर्ष विवेक व्यासपीठ प्रयत्नरत असून त्याच्या वतीने त्रेमासिक ज्येष्ठपर्व प्रकाशित केले जात आहे. महाराष्ट्राभरातील ज्येष्ठ नागरिक संघ आणि ज्येष्ठांच्या भावविश्वात एक विश्वसनीय स्थान ज्येष्ठपर्वने निर्माण केले आहे. ज्येष्ठ म्हणजे विविधांगी क्षेत्रातील विविध अनुभवांचे संचित. या संचिताला मुखर करण्याचा प्रयास या मासिकाच्या माध्यमातून होत आहे.